एनआयएच्या कारवाईचा धडाका सुरुच! देशभरात 8 राज्यांत 25 ठिकाणी छापेमारी

0

नवी दिल्ली : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) पुन्हा एकदा अक्शनमोडमध्ये आली असून देशभरात कारवाईचा सपाटा सुरु झाला आहे.

देशभरात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (PFI) च्या ठिकाणांवर छापेमारीचा दुसरी फेरी सुरु आहे. एनआयएसह इतर यंत्रणांनी पुन्हा एकदा देशभरातील ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, NIA नं कारवाईचा दुसरा राऊंड सुरु केला आहे. अलिकडेच एनआयएनं केरळमधून पीएफआय सदस्य शफिक पैठला अटक केली होती. त्यामुळे यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाटणा रॅली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या निशाण्यावर असल्याचे चौकशीदरम्यान उघड झालं होतं.

एनआयएनं काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशभरातील ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (PFI) च्या ठिकाणांवर छापेमारी केली होती. या कारवाई दरम्यान अनेकांना ताब्यात घेत अटकही केली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत अनेक महत्त्वाचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागले होते. त्याच आधारे 8 राज्यांचे पोलीस आणि इतर तपास यंत्रणांच्या मदतीनं पुन्हा NIA नं देशभरात धाडसत्र सुरु केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 8 राज्यांमध्ये पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. तसेच अनेक पीएफआय सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

कर्नाटक पोलिसांनी आज सकाळी जिल्ह्यातील पीएफआय अध्यक्ष आणि एसडीपीआय सचिवाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएफआयचे जिल्हाध्यक्ष अब्दुल करीम आणि एसडीपीआयचे सचिव शेख मस्कसूद यांना अटक करण्यात आली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मंगळुरु पोलिसांनी PFI आणि SDPI चे सदस्यांनाही ताब्यात घेतलं आहे. तसेच, कोलार जिल्ह्यातील पोलिसांनी पीएफआयच्या 6 सदस्यांना अटक करण्याच आल्याचीही माहिती मिळत आहे.

एनआयएनं काही दिवसांपूर्वी कोलकाता येथील पीएफआयच्या कार्यालयावरही छापा टाकला होता. यादरम्यान तपास यंत्रणेनं अनेक कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स आणि पुस्तिका जप्त केल्या आहेत. एका पुस्तिकेत अलिकडेच मुर्शिदाबाद जिल्ह्यातून अल कायदाच्या दहशतवाद्यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला. ही सर्व कागदपत्रं तपास यंत्रणेनं जप्त केली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.