३ सेकंदात चांदणी चौकातील बहूचर्चित पूल जमीनदोस्त

0

पुणे : पुणे शहरातील चांदणी चौकातील उड्डाणपूल रविवारी मध्यरात्री एक वाजता पाडण्यात आला आहे. अवघ्या सेकंदात स्फोटकांच्यासाहाय्याने पूल पाडण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर पोलिसांसह वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यातआला होता.

पूल पाडण्यासाठी 600 किलो विस्फोटकांचा वापर करण्यात आला. सीसी टीव्ही निगराणीखाली हे मिशन पार पडले आहे. मोठ्यापोलिस बंदोबस्तात हे काम करण्यात आले असून जिल्हा प्रशासनाला सुरक्षतेसाठी परिसरात कलम 144 लावावे लागले होते.

रात्री 2 वाजता हा पुल पाडण्यात येणार होता. परंतु ऐनवेळी याची वेळ बदलण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने 1992 सालीया पुलाचे बांधकाम केले होते. परंतु मुंबईपुणे या गजबजलेल्या रस्त्यावर पुलामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यामुळेहा पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. काही दिवसांपुर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदेसुद्धा पुलाजवळ ट्रफिकमध्ये अडकले होते. त्यानंतर राज्यभरातुन त्यांच्यावर टिका करण्यात आली होती. तेव्हा लवकरच यावरती कायम स्वरुपीचा तोडगा काढण्यात येईल, असेआश्वासन त्यांनी दिले होते.

 

जिल्हा प्रशासनाने या कामाकरता आधीच पुलाजवळील मुंबईपुणे राष्ट्रीय महामार्ग बंद केला होता. पुलावरती पांढरे कपडे टाकुन हेमिशन पुर्ण करण्यात आले आहे. सुरुवातीला अर्धाच पुल पडला की काय अशी शंका घेण्यात येत होती. परंतु पूर्ण पूल पाडण्यात येणारआहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिले.

स्फोट घडवून पूल पाडण्याचे काम करणारी कंपनी ईडीफाईसचे आनंद शर्मा यांनी सांगितले, ज्याप्रमाणे अपेक्षित होते त्यानुसार ब्लास्टझालेला आहे. फार मोठा स्फोट आम्हाला करायचा नव्हता. अपेक्षापेक्षा अधिक स्टील पुलाच्या बांधकामात होते. त्यामुळे संपूर्ण पुलाचासांगाडा पडला नसल्याचे दिसत आहे. संपूर्ण पुलावरील काँक्रिट हटवले असून केवळ स्टील रॉड राहिलेले आहे.काही तासांत ढिगाराहटविण्यात येईल. जेसीबी आणि पोकलेन याच्या साह्याने संपूर्ण खिळखिळा झालेला पुलचा भाग बाजूला करण्यात येईल.

आनंद शर्मा यांनी सांगितले की, पूल पाडण्यासाठी दुसरा कोणताही स्फोट याठिकाणी करण्याची गरज नाही. स्टील जाळीचा सांगाडाजमीनदोस्त करून ढिगारा बाजूला करण्यात येत आहे. स्फोटक भरण्यासाठी पुलावर एकूण १३०० होल्स करण्यात आले होते. त्यापैकीकाही होल्स मध्ये स्फोटक राहिली आहे का? याचीही तपासणी केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.