सिनेतारकांनी केले दणक्यात नवीन वर्षाचे स्वागत

0

मुंबई ः बाॅलिवुडचा दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चनपासून आलिया भट्टपर्यंत सर्वांना धुमधडाक्यात नवीन वर्षाचे स्वागत केलेले दिसेत. त्यांच्या आनंदाचे क्षणचित्र त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केलेले आहेत. चला तर, पाहूया कोणी कसे केले सेलिब्रेशन…

अमिताभ बच्चनने डोक्यावर २०२१ या नवीन वर्षाची कॅप घालून उत्साहात चाहत्यांना स्माईल दिलेली आहे. स्टाइलिश चष्मा आणि डोक्यावरील टोपी पाहून अमिताभ यांचा फोटो पाहण्यासारखा आहे.

त्यांच्याबरोबर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या यांनीदेखील जबरदस्त फोटो क्लिक करून चाहत्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे. या फोटोमध्ये मायलेकी खूप सुंदर दिसत आहेत.

करिना कपूर, सैफ अली खान आणि बहुचर्चित मुलगा तैमूर या तिघांनी हात वर करून नवी वर्षांचे स्वागत करताना दिसते. करिना दुसऱ्यांदा आई होणार आहे, हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत आहे

ट्विंकल खन्ना आणि पती अक्षय कुमार यांनीदेखील एकमेकांसोबत नवीन वर्ष साजरे केले. त्याचबरोबर अक्षयने आपल्या चाहत्यांदेखील नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

सेक्सी अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा ब्वाॅयफ्रेंड अर्जुन कपूर गोव्यात नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी गेलेले आहेत. गोव्यातील एक सुंदर फोटो शेअर करत मलायकाने नवीन वर्ष साजरे केलेले दिसत आहे.

रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे दोघेजण रणथंबोरला आपल्या कुटुंबासोबत नवीन वर्ष एन्जाॅय करण्यासाठी गेलेले आहेत. आलियादेखील खूपच मजा मस्तीत नवे वर्ष एन्जाॅय केलेले दिसते.

Leave A Reply

Your email address will not be published.