नवी दिल्ली : कोरोनाचा प्रभाव कमी होत असताना रुग्णांमध्ये नवं नवीन लक्षणे समोर येत आहेत. दिल्लीतील कोरोना रुग्णांमध्ये गुदाशयातून रक्तस्त्राव होण्याशी संबंधित सायटोमेगालव्हायरस (CMV) या रोगाची पहिली केस आढळली आहे.
कोरोना रुग्णांमध्ये ओटीपोटात वेदना तसेच शौचातून रक्तस्त्राव होत असल्याचे आढळून आलेली ही पहिलीच घटना आहे.
कोरोना झाल्यानंतर जवळपास 20 ते 30 दिवसांनंतर त्यांना हा त्रास जाणवत आहे. एप्रिल-मे महिन्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आम्हाला CMV चे पाच रुग्ण आढळून आलेत ज्यांनी कोरोनावर मात केली आहे. वय वर्षे 30 ते 70 दरम्यानचे हे रुग्ण आहेत.
सर गंगाराम हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांनी म्हटलंय की, यावर्षी संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत ही प्रकरणे समोर आली असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव आणि छातीच्या आजारामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
चार रुग्णांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टायनल रक्तस्त्रावाची लक्षणे आहेत तर एका रुग्णामध्ये आतड्यासंबंधी तक्रार केली आहे. पाच रुग्णांपैकी दोघांनी मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत असल्याचं म्हटलंय ज्यामधील एका रुग्णाची इमर्जन्सी शस्त्रक्रिया करावी लागली आहे.