पुणे : ससून रुग्णालयात डॉक्टर असल्याचे खोटे सांगून तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेचेअश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल केलं . पोलिसांनी तोतया डॉक्टरला अटक केलीआहे.
नायका रुद्रा रमेशराव ऊर्फ किशन रमेशराव जाधव असं गुन्हा दाखल झालेल्या 33 वर्षीय तरुणाचं नाव असून तो विमाननगरपरिसरातील रहिवासी आहे. याप्रकरणी पिंपरी येथील रहिवासी असणाऱ्या 29 वर्षीय तरुणीनं विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याददाखल केली आहे. नराधम आरोपी गेल्या सात महिन्यांपासून पीडित तरुणीला ब्लॅकमेल करत तिचं लैंगिक शोषण करत होता. अखेरपीडितेनं हिंमत एकवटून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून घटनेचा पुढील तपासपोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशन याने आपण डॉक्टर असून ससून रुग्णालयात नोकरीस असल्याची खोटी माहितीदिली होती. तसेच स्वत:चे नर्सिंग आणि फार्मसी कॉलेज असल्याच्या थापा देखील मारल्या होत्या. त्यासाठी आरोपीनं खोटं आयकार्डआणि वैद्यकीय पदवीची कागदपत्रे दाखवून पीडितेचा विश्वास संपादन केला होता. फिर्यादीच्या घरी सुरू असलेल्या कौटुंबीक वादाचागैरफायदा घेत आरोपीनं जवळीक साधून तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित करत अश्लील व्हिडीओ शूट केले होते. संबंधितव्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं पीडितेवर अनेकदा बलात्कार केला होता.
याशिवाय, आरोपीनं फिर्यादी तरुणीच्या नातेवाईकांना नोकरी लावण्याच्या बहाण्याने तिच्याकडून तब्बल 16 लाख 65 हजार रुपयांचीरक्कम घेतली होती. पण नातेवाईकांना नोकरी न लावता त्यांची आर्थिक फसवणूक केली होती. बदनामीच्या भीतीने फिर्यादी तरुणीआरोपीचा सर्व छळ निमूटपणे सहन करत होती. अखेर तिने हिंमत एकवटून पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तोतयाडॉक्टरला अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.