इंद्रायणी नदीत पडलेली तरुणी आठव्या दिवशीही बेपत्ता

0

पिंपरी :  मावळ, कुंडमळा येथे वर्षा विहारासाठी आलेल्या वीस वर्षीय तरुणीचा पाय घसरल्याने ती नदी पत्रात पडली. तिचा शोध आज आठव्या दिवशीही लागलेला नाही.

हरवलेल्या तरुणीचे नाव साक्षी वंजारे (20 असून रा. कस्तुरी मार्केट समोर, थर्मॅक्स चौक, आकुर्डी) आहे. कुंडमळा हे पर्यटन स्थळ देहू रोडवर तळेगाव दाभाडे या दोन शहरापासून जवळ आहे. साक्षी हि आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर कुंडमळा येथे वर्षा विहारासाठी आली होती. तिचे मित्र-मैत्रिणी मागे राहिले आणि ती एकटीच काठावर होती. तिचा पाय घसरला आणि ती इंद्रायणी नदीत पडून वाहून गेली.

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी, वन्यजीव रक्षक मावळ व शिवदुर्ग लोणावळा यांच्या पथकांनी तीचा शोध घेतला. पण तीचा शोध अजून लागलेला नाही.

तिचे वडील सतिष वंजारे म्हणाले, की आजही (जुलै 13) तिचा शोध लागला नाही. आमचे पूर्ण कुटुंब व सर्व नातेवाईक देवाकडे प्रार्थना करत आहोत, की साक्षी लवकर सापडावी व सर्वांना आशा आहे, की ती लवकरच सुखरूप भेटेल. वन्यजीव रक्षक मावळचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे म्हणाले, की त्यांच्या पथकाने खूप शोध घेतला परंतु, साक्षीचा शोध अद्याप लागला नाही. आता मावळमध्ये मुसळधार पावसाने नदीत पाणी वाढले आहे व पाण्याचा वेग पण वाढला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.