तरुणाच्या डोक्यात फोडली काचेची बाटली फोडली

0

पिंपरी : पिंपळे गुरव, सृष्टी चौकात भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाला हॉटेलमध्ये बोलावून मारहाण केली. तसेच तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. ही घटना सोमवारी (दि. 16) दुपारी घडली.

शेखर बाबासाहेब गुंड (29, रा. एम. के. चौक, नवी सांगवी) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुभम थोपटे (22) आणि सचिन शिंदे (25, दोघेही रा. शिवशंभो कॉलनी, सदगुरूनगर, भोसरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन शिंदे याने शैलेश इंगळे याच्यासोबत गाडी विक्रीच्या कारणावरून झालेला जुना वाद मिटविण्यासाठी सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास सृष्टी चौक, पिंपळे गुरव येथे बोलविले. त्यावेळी त्यांच्यात बोलणे सुरू असताना आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तसेच ‘आमच्यातील भांडणे मिटविणारा तू कोण’, असे म्हणत तुला बघुन घेतो, धमकी दिली. त्यावेळी आरोपी शुभम थोपटे याने जवळ पडलेली काचेची बाटली शेखर गुंड यांच्या डोक्‍यात मारल्याने ते जखमी झाले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.