पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील कोविड आजाराच्या बाबतीतील उपाययोजनांमध्ये होत असलेल्या गैरसोयी व हेळसांड पाहता शासनाने त्वरित पूर्णवेळ विशेष अधिकारी नेमून त्यांद्वारेच सर्व कोविड केअर सेंटर्सची दैनंदिन पाहणी व योग्य नियोजन करावे अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे इमेलच्या माध्यमातून निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे .
निवेदनात साठे यांनी नमूद केले आहे की , या अडचणीच्या काळात नागरिकांना ना गैरसोय , अडचणी व मनस्ताप होतो आहे आणि आणि त्या बाबतीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची उपलब्ध यंत्रणा अपुरी व कमकुवत आहे .
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून उभारण्यात आलेल्या व खाजगी संस्थेकडून संचलित असलेल्या नेहरूनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटर मध्ये अनेक अपू – या सुविधांमुळे नागरिकांच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त होत आहेत .
याबाबत तात्काळ विशेष अधिकारी नेमावा व सर्व प्रथम नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात व गैरसोयीनां जबाबदार असणाऱ्या वर कारवाई करावी अशी मागणी साठे यांनी केली आहे .