”राज्यपाल पक्षाच्या आदेशाप्रमाणे वागतात की…”

0

पुणे ः “महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळाने विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या नावांची यादी जाहीर करण्या राज्यपाल उशीर करत आहेत. ते कोणत्याही पक्षाचे नसतात. पण आधी कोणत्या पक्षाचे होते, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे ते पक्षाच्या आदेशाप्रमाणे वागतात की, घटनेने दिलेल्या अधिकाराने हा प्रश्न पडतो”, अशा शब्दात नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली.

पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. राज्यपालनियुक्त सदस्यांची यादी मी स्वतः, अनिल परब आणि अमित देशमुख यांनी मिळून राज्यपालांना दिली होती. त्यानंतर त्यांनी ती नावे जाहीर कराला हवी होती. मात्र, अजूनही ती नावे त्यांनी जाहीर केलेली नाहीत.
राज्यात १२ आमदार काम करतील, त्यामुळे लवकर नावे जाहीर करा अशी आमची त्यांनी विनंती आहे. भाजपात गेलेल्या अनेक जणांना परत यायचे आहे हे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले, हे खरेच आहे. भाजपाने आता त्यांचे लोक सांभाळावेत, अनेक जण संपर्कात आहेत. येत्या चार महिन्यांत ही वापसी सुरू होईल, असे मत मलिक यांनी मांडले.
Leave A Reply

Your email address will not be published.