राज्यपालांना कंगणा रनौतला भेटायला वेळ आहे मात्र शेतकऱ्यांसाठी नाही

0

मुंबई : दिल्लीला सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारोच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले आहेत. यावेळी शेतकरी राज्यपालाना निवेदन देण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना अडवले.

कंगणा रनौतला भेटण्यासाठी वेळ आहे, मात्र आमच्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, असे राज्यपाल महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाहिले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले.

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून व अन्य काही मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी संघटनांनी आज मुंबईतील आझाद मैदानावर संयुक्त मोर्चा काढला आहे. अनेक संघटना यात सहभागी झाल्या असून महाविकास आघाडीतील पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून शरद पवार हे स्वत: आंदोलनस्थळी गेले होते. तिथं त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

‘देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात मुंबईनं आक्रमकपणाची भूमिका घेतली. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मुंबईतील कष्टकरीवर्ग रस्त्यावर उतरला, या वेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लोक मुंबईला आले आहेत, असं म्हणत, पवार यांनी सर्व मोर्चेकऱ्यांचे आभार मानले.

शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळात सचिन सावंत, भाई जगताप, चरणसिंह सप्रा, मेधा पाटकर, अशोक ढवळे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. मोर्चा अडवल्यानंतर आक्रमक झालेल्या अजित नवले यांनी सांगितलं की, राज्यपाल पळून गेले. आम्हाला अडवलं गेलं. पोलिस ही देखील शेतकऱ्यांची पोरं आहेत. त्यांनाच आमच्या विरोधात उभं केलं आहे.

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, राज्यपाल पळून गेले. कंगणा रनौतला भेटायला गोव्याला जातात हे अत्यंत निषेधार्ह बाब आहे. आम्ही शिष्टमंडळ जाणार होतो. हे राज्यपाल आल्यापासून ही पहिली वेळ नाही. ते याआधीही पळून गेले होतो. राज्यपाल पळपूटे आहेत, असं ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.