उच्चशिक्षित तरुणाने गावातील सत्तेचे राजकारण संपवले

0

कर्जत : शहरात मोठ्या कंपनीत व्यस्थापक पदावर असलेल्या तरुणाने गावातील गावकी-भावकीचे आणि सत्तेचे राजकारण संपवले. कर्जत तालुक्यातस्या पोशीर ग्रूप ग्रामपंचायती मध्ये परिवर्तन झाले आहे.

अनिल जोशी हे MBA झालेले. मोठ्या शहरात एक बड्या कंपनी मॅनेजर असणारे जोशी गावच्या विकासासाठी राजकारणात उतरले. निवडणुकीत शिवसेना-शेकाप प्रणित परिवर्तन पॅनलने बाजी मारली आहे. या भागात शेकापचं प्रथमपासून वर्चस्व आहे. पण विकासाचं धोरण राबवू असं सांगणाऱ्या अनिल जोशींना ग्रामस्थांनी नवा सरपंच म्हणून आधीच मान्यता दिली. ते मोठ्या मताधिक्याने निवडणूक जिंकले.

जोशी यांना या आधीच सरपंच पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.त्यामुळे पोशिर ग्रुप ग्रामपंचायतीत पुढचे सरपंच अनिल जोशी असणार आहेत हे निश्चित. गावाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.