प्रत्येक महिन्यात पोलीस ठाण्यात जनता दरबार घेण्याचे गृहमंत्र्यांनी दिले आदेश

लवकरच मिळणार चार हेक्टर मध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालयाला सुसज्ज इमारत

0

पिंपरी : पोलिसांनी नागरिकांच्या समस्या सोडविल्या पाहिजेत, नागरिकांशी सुसंवाद ठेवला पाहिजे. यासाठी इथून पुढे प्रत्येक पोलीसठाण्यात प्रत्येक महिन्यात जनता दरबार घेण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीसआयुक्तायाची इमारत मोशी येथील चार हेक्टरच्या भूखंडावर होणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्याशीचर्चा झालेली असून या ठिकाणी आयुक्ताल्याची सुसज्ज इमारत उभी केली जाणार असल्याचेही वळसे पाटील यांनी सांगितले. तसेचराज्यात 5200 जागांसाठी पोलीस भरती होणार असून पैकी 720 जण पिंपरी चिंचवडसाठी मिळणार असल्याचेही वळसेपाटील यांनीसांगितले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसेपाटील आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलतानात्यांनी हे सांगितले. यावेळी पोलीस महासंचालक संजय पांडेय, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्तरामनाथ पोकळे उपस्थित होते.

वळसेपाटील म्हणाले; पिंपरी चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी, शहरीभाग आणि ग्रामीण भाग या ठिकाणची गुन्हेगारी, काम करतानाभेदसविणाऱ्या समस्या, मनुष्यबळाची, वाहनांची कमतरता या विषयावर आढावा घेण्यात आलेला आहे. येणाऱ्या काळात या सर्व समस्यासोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे

पिंपरीचिंचवड पोलीस सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र नागरिक आणि पोलीस यांच्यातीलसंबंध अधिक दृढ होण्याची गरज आहे. यासाठी जनता मेळावे घेण्याच्या सूचना दिल्या आहेत

पुणे ग्रामीण मधील वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा हा भाग पिंपरी चिंचवड आयुक्तालयास जोडण्याचा प्रस्ताव आलेला आहे. यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या नियमावलीचे पालन करावे. पर्यटनासाठीबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.