पिंपरी : किरकोळ कारणावरून तरुणाने हॉटेल मालकालाच लोखंडी पाईपने मारहाण केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.8) रात्री हॉटेल दत्तकृपा, निघोज,खेड येथे घडला आहे.
याप्रकरणी नामदेव तुकाराम सोनावणे (45, रा.महाळुंगे) यांनी फिर्याद दिली असून मयूर मराठे (25, रा.महाळुंगे) याच्या विरोधात चाकण पोलीस ठाणे येथे गुन्ह दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हॉटेल शेजारी असणाऱ्या संडास बाथरुमला कुलुप लोवत होते. यावेली कुलुप का लावता अशी विचारणा आरोपीने केली. यावेळी फिर्यादींनी बाहेरचे लोक वापरत आहेत म्हणून कुलुप लावत असून तुला हवी तेव्हा चावी घेऊन जा असे सांगितले. आरोपीने चिडून जाऊन तू काय मालक आहेस का म्हणत शिवीगाळ केली व लोखंडी पाईपने फिर्यादी यांना मारहाण करत जखमी केले. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत.