संतोषचे मूळ गाव अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील नारवाटी आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथीपर्यंतचे धडे गिरविल्यावर संतोष अमरावतीच्या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये पोचला. बारावीनंतर पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून (सीओईपी) सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बीटेकची पदवी त्याने मिळविली. त्यानंतर दीड वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात देशांमध्ये ५४६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. जम्मूमध्ये उपविभागीय दंडाधिकारी पदावर काम केल्यानंतर त्याची नुकतीच कारगिलच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली.
अमरावती : महाविद्यालयीन शिक्षण घेताना ‘कमवा आणि शिका’ योजनेतून घडलेल्या संतोषने कारगिलच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे नुकतीच स्वीकारली. अमरावतीच्या आदिवासी बहुल भागातील संतोषच सगळंच शिक्षण सरकारी शाळांतून झालं अन तो ‘आयएएस’ झाला. परिस्थिती आड येत नाही जेव्हा शिकण्याची ऊर्मी असेल. ही उक्ती मेळघाटातल्या संतोष सुखदेवे या युवकाने सिद्ध करून दाखवली.