डाव पलटला… टीआरएसने भाजपाला मागे सारले

0

हैदराबाद ः असदुद्दीन ओवेसींचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या हैदराबादमध्ये एमआयएम वाट्याला पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे. सुरुवातील भाजपाने मुसंडी मारलेली होती. आता टीआरएसने भाजपाला मागे सारलेलं आहे. आता दुसऱ्या स्थानावर भाजपा आलेला आहे. तर एमआयएम तिसऱ्या स्थानावर आहे.

टीआरएस ६६ जागांवर आघाडीवर आहे. तर, भाजपा ४० जागांवर पुढे मागे आला आहे. एमआयएम ३४ जागांवर पोहोचला आहे. हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांचा दिवस खास आहे. १५० वाॅर्ड्ससाठी ११२२ निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. निवडणुकीचे खास वैशिष्ट्य हे की, या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत केंद्रातील भाजपाने उडी घेतलेली होती. असदुद्दीन ओवेसी, चंद्रशेखर राव आणि भाजपा यांची तिरंगी लढत सुरू आहे.

३० ठिकाणी मतमोजणी केंद्रांची स्थापना केली आहे. प्रत्येक सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. मागील वेळी टीआरएसने महापालिकेवर आपली सत्ता स्थापन केलेली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.