नवी दिल्ली : आयपीएलचा लिलाव पार पडला असून क्रीडाप्रेमींना कधी एकदा आयपीएल सुरू होती याची उत्सुकता लागली होती. अशातच क्रिकेट रसिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयपीएल स्पर्धा पुढील महिन्यात 26 मार्चपासून सुरू होणार असल्याच माहिती समजत आहे तर आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना 29 मे ला होऊ शकतो.
आयपीएल स्पर्धेचे सामने मुंबईत खेळवण्यात येणार आहेत. मात्र गरज पडली तर सामने पुण्यातही होऊ शकतात. साखली फेरीतील 70 सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियम, डी. वाय पाटील आणि ब्रेबॉर्न या मैदानांवर एकूण 55 सामने होणार आहेत.
IPL 2022 will start from March 26 with the first match between Chennai Super Kings and Kolkata Knight Riders at the Wankhede Stadium in Mumbai: BCCI pic.twitter.com/NrvxnMpOgK
— ANI (@ANI) March 6, 2022
बीसीसीआयच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक २४ फेब्रुवारीला प्रस्तावित आहे, त्यात तारखांचा विचार केला जाऊ शकतो. या बैठकीत पूर्ण वेळापत्रक, ठिकाण आणि तारखा यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 10 संघ असल्यामुळे भारतीय खेळाडूंना अधिक संधी मिळण्याची अपेक्षा आहे. या स्पर्धेत चांगला खेळ दाखवून तो भारतीय संघातही स्थान मिळवू शकतो.
दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली मुंबई इंडियन्सने आपल्या जुन्या खेळाडूसाठी लावली. धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन याच्याकरिता मुंबई इंडियन्सने 15 कोटी 25 लाखांची बोली लावली होती.