विधानपरिषदेच्या 12 आमदारांची यादी राज्यपालांकडेच असल्याची माहिती समोर

0

मुंबई : विधानपरिषदेच्या 12 सदस्यांचा कार्यकाळ जूनमध्ये (2020) संपुष्टात आला. या रिक्त जागांसाठी महाविकास आघाडीकडून राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 12 जणांची यादी निश्चित करण्यात आली होती. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने विधानपरिषद सदस्य नियुक्ती करण्यासाठी 12 जणांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आले होते.

या प्रलंबित प्रकरणामुळे राज्यपाल आणि राज्य सरकार वाद उफाळला आहे. मधील काही दिवसात ती यादी गहाळ झाल्याची माहिती आली होती. मात्र ही 12 सदस्यांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेच असल्याची माहिती समोर आलीय.

राज्यपाल नियुक्त सदस्य 12 जणांची यादी ही माहिती अधिकारात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआयचे (RTI) कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली होती. मात्र, आज (मंगळवार) 15 जून रोजी राजभवन सचिवालयात यासंदर्भात RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिलेल्या आव्हान याचिकेवर सुनावणी झाली.

त्यामध्ये ती 12 जणांची यादी राज्यपालाने स्वतःकडे ठेवली असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच आता राज्यपालांने याबाबत निर्णय घेतल्यावरच माहिती मिळणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, राज्यपालांनी मागील 8 महिन्यांपासून राज्य सरकारने पाठवलेल्या राज्यपाल नियुक्त सदस्य 12 जणांच्या यादीवर कोणताच निर्णय घेतला नसल्याचं पुढं आलं आहे

Leave A Reply

Your email address will not be published.