शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीच्या चर्चेवर आमदाराने केला एक व्हिडीओ शेयर

0

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात अहमदाबादमध्ये गुप्त भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यानंतर, भाजपा आमदाराने देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

भाजपाचे आमदार राम सातपुते यांनी देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेतील एक जुना व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. एकीकडे शरद पवार-अमित शहा भेटीची चर्चा असतानाच दुसरीकडे भाजपा नेत्यांकडून अशाप्रकारे सिम्बॉलिकपणे राजकीय बदलाची हवा फुकण्यात येत आहे. राम सातपुते यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटंवरुन व्हिडिओ शेअर करुन पिन टॅगही केलाय. त्यामध्ये, मै समंदर हूँ, लौटकर वापस आऊंगा … असं फडणवीस म्हणताना दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसशी निकटचे संबंध असलेल्या उच्चपदस्थ सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार शरद पवार आणि प्रफुल पटेल शुक्रवारी, २६ मार्च रोजी उद्योगपती गौतम अदानी यांच्या कुटुंबातील विवाहसोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अहमदाबादेत आले. वस्तुत: हा विवाहसोहळा शनिवारी, २७ मार्च रोजी होता.

परंतु अदानी परिवारातील आनंदसोहळ्यात सहभागी होण्यासाठी दोन्ही नेते आदल्या दिवशीच अहमदाबादमध्ये आले. पवार आणि पटेल दोघेही जण अहमदाबादेत असतानाच अमित शहा यांचेही शहरात आगमन झाले. मात्र, पवार आणि पटेल यांनी शहा यांची भेट घेतली नाही. या तिघांमध्ये भेट झाल्याची नुसतीच चर्चा रविवारी प्रसारमाध्यमांमध्ये रंगली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.