मुंबई ः बाॅलिवूड अभिनेता इम्रान हश्मी आणि अभिनेत्री सनी लिओनी यांना एक मुलगा आहे आणि तो बिहारच्या मुजफ्फपूरमध्ये शिकतो आहे. आश्चर्य वाटलं ना? हो, भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठांतर्गत येणाऱ्या मिनापूरमधील धनराज मेहता महाविद्यालयात बीएच्या दुसऱ्या वर्षाला शिकतो आहे.
या विद्यार्थ्याचे नाव कुंदर कुमार आहे. त्याने आपल्या परीक्षा अर्जामध्ये वडिलांचे नाव म्हणून अभिनेता इम्रान हश्मी आणि आईचे नाव सनी लिओनी लिहिलेले आहे. सद्या या अर्जाची फोटो काॅपी सोशल मीडियावर वेगात व्हायरल होत आहे. हा अर्ज इम्रान हश्मीकडे गेल्यानंतर त्याने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो, ”शपथ घेऊन सांगतो, हा माझा मुलगा नाही”
त्या विद्यार्थ्याच्या ओळखपत्रावरील पत्ता हा चुतूर्भूज येथील आहे आणि हे स्थान रेट लाईट एरिओ म्हणून परिसरात प्रसिद्ध आहेत. आई-वडिलांचे अडनाव वेगवेगळे कसे असू शकते. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार घडला असावा, त्यामुळे चौकशीचे आदेश दिले आहेत.