राहत्या घरात एकाचा खून, सात दिवसानंतर उघडकीस आली घटना

0
पुणे : हडपसर परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका व्यक्तीचा राहत्या घरात खून करण्यात आला असून सात दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ग्रेगरी जॉन कार्डोस (वय ४२) असे खून झालेल्याचे नाव आहे. खून झाल्याची माहिती मिळताच हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी पत्नी शहनाज कार्डोस यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रेगरी हे इलेक्ट्रिकची कामे करत होते. त्यांचे आणि  पत्नी शहनाजचे वाद होते. त्यामुळे पत्नी त्यांच्याजवळ राहत नव्हती. लॉकडाऊनमुळे ग्रेगरी घरीच राहत होते. आज पहाटेच्या वेळी त्यांच्या घरातून वास येत असल्याने नागरिकांनी डोकावून पाहिले. त्यानंतर ग्रेगरीचा मृतदेह नागरिकांना दिसून  आला. घटनेची माहिती मिळताच हडपसर  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पाहणीत अज्ञाताने त्याचा खून केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ग्रेगरी यांना दारूचे व्यसन होते. त्यांना आजार देखील होता. पोस्टमोर्टमनंतर त्यांच्या  मृत्यूचे कारण समजू शकेल असे पोलिसांनी सांगितले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.