‘थर्टी फस्ट’च्या रात्री ‘त्या’ तरुणीचा खून

0

मुंबई : इमारतीच्या टेरेसवर आक्षेपार्ह स्थितीत बसलेल्या जोडप्याला हटकल्याने जोडप्याने तरुणीवर हल्ला केला. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना खार परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खार परिसरात भगवती हाईट्स इमारतीच्या गच्चीवर नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत इमारतीतील काही रहिवाशी, तसेच त्यांचे जवळचे मित्र, नातेवाईक सहभागी झाले होते. या पार्टीत अनेकांनी दारु प्यायली होती.

पार्टी सुरु झाल्यानंतर ती मृत मुलगी गच्चीवर पोहोचली. त्यावेळी त्या ठिकाणी एक जोडपे आक्षेपार्ह स्थितीत तिथे बसले होते. त्या मृत मुलीने त्या जोडप्याला हटकत त्यांच्यावर आक्षेप घेतला. यावरुन या जोडप्याचा आणि त्या मुलीचा वाद सुरु झाला.

काही वेळाने हा वाद अगदी विकोपाला पोहोचला. त्या जोडप्याने त्या मुलीला जबर मारहाण केली. या मारहाणीदरम्यान तिला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.