सुप्रसिद्ध गायक केके यांच्या मृत्यूचे गूढ वाढले

0

पिंपरी : सुप्रसिद्ध गायक केके यांचे काल अकस्मात निधन झाले. वयाच्या 53 व्या वर्षी केके यांनी जगाचा निरोप घेतला त्यामुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, केके यांच्या निधनानंतर एक धक्कादायक बाबत समोर आली आहे. गायक केके यांच्या मृत्यूप्रकरणी न्यू मार्केट पोलिस ठाणे येथे अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. केकेआर यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमेच्या खुणा आढळल्याने एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे.

केके यांच्या मृत्यूनंतर पोलिस त्यांच्या कुटुंबियांची वाट पाहत आहेत. त्यांची संमती मिळताच मृतदेहाची ओळख पटवणे, चौकशी, पोस्टमार्टम अशा प्रक्रिया केल्या जाणार आहेत. एमएसकेएम रुग्णालयातच पोस्टमार्टमची व्यवस्था केली जाणार असून दुपारपर्यंत कुटुंबियांना मृतदेह ताब्यात घेता येणार आहे.

गायक केके यांचा काल कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये लाईव्ह कॉन्सर्टचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान लाईव्ह काॅन्सर्ट संपवून हाॅटेलला परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यावेळी त्यांनी ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते तिथेच कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी धक्कादायक बाब अशी की, केके यांच्या मृत्यूनंतर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गायक केके यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमेच्या खुणा आढळ्याने त्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, पोस्टमार्टमनंतरच मृत्यूचे खरे कारण समजू शकेल असे डाॅक्टरांनी माहिती दिली असून याप्रकरणी खोलवर तपास पोलिस यंत्रणेकडून करण्यात येत आहे. तपास अधिकारी पोर्टमार्टमच्या प्राथमिक अहवालाचीच वाट पाहत आहेत.

बाॅलिवूडला साधारण 200 पेक्षाही जास्त सुपरहिट गाणी केके यांनी दिली आहेत. त्यांच्या अनेक लोकप्रिय गाण्यांपैकी तडप तडप के इस दिल से, अभी अभी, तु जो मिला, ऑंखो में तेरी, खुदा जाने असे एक ना अनेक गाणी अजूनही सगळ्यांच्या मनावर राज्य करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.