पुणे : पुण्याच्या मगरपट्टा परिसरातील एका उद्यानाजवळ एक जानेवारीला रस्त्यावर मृतदेह सापडला होता. मालवाहू टेम्पो उलटून काही नागरिकांनी फुटपाथवर हा मृतदेह आणून फेकला होता. या खुनाचे गूढ उकलले असून पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. एका केटरर्सने कामगाराचा खून करून हा मृतदेह मगरपट्टा चौकातील फुटपाथवर फेकल्याचे निष्पन्न झाले आहे.
संतोष (संपूर्ण नाव माहीत नाही) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी व्यावसायिक नारायण शंकर व्यास (वय 30), जितेश तुकाराम कदम, संतोष सुंदर पुजारी आणि संपत मारुती काळे यांना अटक केली आहे. या प्रकार हडपसर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 1 जानेवारी या दिवशी 1 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या पिकप गाडीतून आलेल्या चौघांनी मगरपट्टा चौकातील फुटपाथवर चादरीत गुंडाळून मृतदेह टाकत पळ काढला होता. मगरपट्टा चौकात असणाऱ्या अनेक नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार पाहिला होता. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली होती.
तपासादरम्यान पोलिसांना त्या पिकप गाडीचा नंबर मिळाला होता. त्यानंतर ही गाडी लोणी काळभोर येथील नारायण व्यास यांच्या मालकीची असल्याचे समजले होते. हडपसर पोलिसांनी त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांच्या मदतीने नारायण व्यास याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत मृतदेहाचे गूढ उकलले. दरम्यान ब-याच संतोष याचा मृत्यू गळा दाबून घराचे शवविच्छेदन अहवालावरून उघड झाले आहे. आरोपींनी संतोष याचा खून का केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.