मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा 39 दिवसांपासून लांबलेला विस्तार अखेर मंगळवारी सकाळी 11 वाजता राजभवनात पार पडणार आहे. त्यात भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रत्येकी 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. भाजपच्या यादीत काहीनव्या चेहऱ्यांचा समावेश असल्याचीही चर्चा आहे. सोमवारी दिवसभर शपथ घेणाऱ्या आमदारांना फोन करून निरोप देण्यात आलेत. दरम्यान, स्वच्छ प्रतीमा असलेल्या आमदारांनाच मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.
भाजप
1. सुरेश खाडे,
2. चंद्रकांत पाटील,
3. राधाकृष्ण विखे,
4. गिरीश महाजन,
5. अतुल सावे,
6. रविंद्र चौहान,
7. विजयकुमार गावित,
8. सुधीर मुनगंटीवार,
9. मंगलप्रभात लोढा
शिंदे गट
1. दादा भूसे,
2. संदीपान भूमरे,
3. उदय सामंत,
4. शंभूराज देसाई,
5. गुलाबराव पाटील,
6. अब्दुल सत्तार,
7. संजय राठोड,
8. दिपक केसरकर,
9. तानाजी सावंत