पुणे : सन 2008 साली मुंबईमधील दहशतवादी हल्ल्यातील शाहिदांना न्याय मिळण्यासाठी पाकिस्तान विरुद्ध जगातील सगळ्या देशांनी आवाज उठवावा, आशा भावना युवकांनी व्यक्त केल्या आहेत.
टॉक महाराष्ट्राच्या वतीने 26/11 मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युवकबरोबर संवाद साधण्यात आला. यावेळी 26/11 हल्ल्यातील शाहिदांना श्रद्धांजली वाहताना युवकांनी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा निषेध केला.
26/11 च्या हल्ल्यात शहिद झालेल्या सर्व वीरांना इको पेटलर्स संस्थेच्या वतीने चिंचवड ते गेट वे ऑफ इंडिया सायकल रॅली काढून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या रॅलीत आयर्नमॅन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी लोणावळा प्रयत्न सायकल चालवत सहभाग नोंदविला. तरुण उद्योजक बाबा भोईर आणि मित्र सहभागी झाले होते.
त्याप्रमाणेच जगातील सगळ्या देशांनी पाकिस्तानवर बहिष्कार टाकण्याची गरज असल्याचे मत ही युवकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, पुणे आणि पिंपरी – चिंचवडमध्ये आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये अधिकारी आणि नागरिकांनी शाहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे.