देशांत कुपोषितांची संख्या १९ कोटी

१३ राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचादेखील समावेश

0

 नवी दिल्ली ः ५ वर्षांखालील मुलांमध्ये २०१५-१६ च्या तुलनेत महाराष्ट्र राज्यासह तेरा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. त्यामध्ये केरळ, हिमाचल प्रदेश, गोवा, मेघालय, मिझोराम, नागालॅण्ड, तेलंगणा, त्रिपूरा, प. बंगाल, गुजरात ही राज्ये, त्याच बरोबर लक्षद्विप, दादर-नगर हवेली आणि दीव दमण या केंद्र शासित प्रदेशांचा समावेश आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात ही चिंतादायक बाब दिसून आली. या सर्वेक्षणानुसार सुमारे १६ राज्यांमध्ये वजनामध्ये अतिशय कमी असलेले बालक वाढत आहेत. त्यांचे वय ५ वर्षाहून कमी आहे. करोना काळात गावातील गरीब कुटुंबातील बालकांना सकस आहार देण्याच्या निधील केंद्राकडून कात्री लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशी आहे कुपोषितांची आकडेवारी ः भारतात ५ वर्षांखालील बालके कमी वयात मरण पावतात, त्यातीत ६८ टक्के मृत्यू हे कुपोषणाने होतात, हे २००२ ते २०१७ या काळातील आहे. बालकांच्या मृत्यूचे प्रमाणात घट झाली आहे, मात्र कुपोषणाचे प्रमाण वाढतच आहे, हे योग्य नाही असे सर्वेक्षणता म्हटलं आहे. सध्या भारतात १९ कोटी कुपोषितींची संख्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.