पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यासाठी Edifice engineering या कंपनीची NHAI ने निवड केलीय. ही तीच कंपनी आहे ज्या कंपनीकडून काही दिवसांपूर्वी दिल्लीतील ट्वीन टॉवर्स पाडण्यात आले होते. त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात येणार आहे. हा पूल 10 सेकंदात पाडण्यात येणार आहे.
पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नवीन उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. त्यामुळे जुना पूल पाडण्यात येणार आहे. त्यासाठी edifice engineering या कंपनीचे कर्मचारी उद्या सर्वेक्षण करण्यासाठी या पुलाची पाहणी करणार आहेत. ज्या कंपनीनं दिल्लीतला ट्विन टॉवर पाडला. त्याच Edifice engineering या कंपनीला या पुलाचे पाडण्याचं कंत्राट देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे पाडकाम कंट्रोल्ड एक्स्ल्पोजन सिस्टिमद्वारे होणार आहे.
कंट्रोल्ड एक्स्प्लोजन म्हणजे काय?
• कमीतकमी वेळेत पाडकाम केले जाते
• या पद्धतीमुळे आजूबाजूच्या इमारतींना धोका निर्माण होत नाही
• इमारतीचा ढिगारा दूरपर्यंत पसरत नाही
• इमारतीमध्ये खास प्रकारची स्फोटके फिट केली जातात
• एकाचवेळीत्यांच्यात स्फोट घडवून आणला जातो
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा चांदणी चौकातल्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकला आणि अखेर चांदणी चौकातल्या ट्रॅफिक जामवर रामबाण उपाय मिळाला. दिल्लीची कंपनी पुण्यातला पूल पाडणार आणि पुणेकरांची कोंडीतून सुटका करणार आहे.