जळगावमधील पोलिसांच्या ‘त्या’ कृत्यावरुन विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले

0

मुंबई : विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरले. जळगाव येथील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी सभागृहात राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

जळगावमधील घटनेचा उल्लेख करत सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मी आजपासून स्वत: राष्ट्रपती राजवटीसाठी मागणी करणार आहे. आमच्या आई-बहिणी सुरक्षित नसेल, तर एकच पर्याय आणि तो म्हणजे राष्ट्रपती राजवट, असा सुधीर मुनगंटीवार यांनी इशारा दिला. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवारांची बाजू लावून धरली.

लोकशाहीमुळे सरकार बरखास्तीची मागणी करण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्यामुळे, मुनगंटीवारांच्या मागणीत काही गैर नाही, कारण संदर्भातील घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत. केवळ एखादी बातमी असती तर गोष्ट वेगळी होती. पण, त्या मुलीला नग्न करुन पोलीस नाचवत आहेत, ही व्हिडिओ क्लीप याठिकाणी आली आहे. त्यामुळे, आपण संवेदनशीलतने तत्काळ कारवाई करावी, यासाठी ही तळमळ असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं.

जळगाव येथे शासकीय वसतिगृहात पोलिस हे महिलांना चौकशीच्या नावाखाली नाचवित असल्याचा प्रकार अतिशय गंभीर आहे. सुधीर मुनगंटीवार अधिवेशनात म्हणाले की, आमच्या राज्यातील आई- बहिणींना नग्न करुन नाचायला लावलं जात आहे. यासंबंधिचे सर्व व्हिडिओ देखील असताना तुम्ही आम्ही नोंद घेऊ, असं सांगतात अशी टीका सुधीर मुनगंटीवार राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केली आहे. यासोबतच आता राष्ट्रपती राजवट लावावी लागेल.

यासाठी मी आजपासून स्वत: राष्ट्रपती राजवटीसाठी मागणी करणार आहे. आमच्या आई- बहिणी सुरक्षित नसेल, तर एकच पर्याय आणि तो म्हणजे राष्ट्रपती राजवट, असा सुधीर मुनगंटीवार यांनी इशारा दिला आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या या मागणीनंतर या सदर घटनेची चौकशी चालू आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. चौकशी झाल्यानंतर दोन दिवसांत तात्काळ कारवाई करणार असल्याचे आश्वासन अनिल देशमुख यांनी दिले.

जननायक फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे आदींनी मंगळवारी दुपारी वसतिगृह गाठून महिला व मुलींना भेटून माहिती जाणून घेतली असता १ मार्च रोजी काही पोलीस कर्मचारी व बाहेरील पुरुष यांनी मुलींना कपडे काढून जबरदस्तीने नृत्य करायला भाग पाडले.

Leave A Reply

Your email address will not be published.