लोकप्रतिनिधीच दाखवतात करोनाच्या नियमांना कात्रजचा घाट

0

पुणे : देशात, राज्यात कोरोनाच्या महामारीचा नागरिकांना किती फटका बसला आहे हे सर्वांना माहीत आहे. सोशल डिस्टन्सीग पाळणे, मास्क लावणे, गर्दी न करणे याबाबत वारंवार सरकार सांगत असताना आपलेच लोकप्रतिनिधी त्याचे पालन करत नसल्याचे दिसत आहे.

भाजप माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आमदार राम सातपुते यांच्या विवाह सोहळ्याला माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, आमदार नितेश राणे, आमदार सुधीर परिचारक यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळीनी हजेरी लावली होती. या लग्नसमारंभात कोरोनाच्या नियमांना राजकीय लोकांनी कात्रजचा घाट दाखवला.

भाजप माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आमदार राम सातपुते यांचा विवाहसोहळ रविवारी पडला. पुण्यातील शुभारंभ लॉन्समध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लग्नसमारंभांसाठी जास्तीत जास्त २०० लोकांची उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. परंतु यावेळी उपस्थितांची संख्याही अधिक होती. तसंच लग्नसमारंभात असलेल्या बैठक व्यवस्थेमध्येही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करण्यात आलं नसल्याचंही दिसून आलं.

Leave A Reply

Your email address will not be published.