कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता; लहान मुलांना धोका

0
नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना सप्टेंबरमध्ये तिसरी लाट धडकणार असल्याचे बोलले जात आहे. पहिल्या दोन लाटांपेक्षाही तिचा तडाखाजबरदस्त असेल. ऑक्टोबरमध्ये तर ती रौद्ररूप धारणकरेल. या तिसऱया लाटेचा सर्वाधिक फटका लहान मुलांनाबसणार आहे. त्यामुळे आतापासूनच सतर्क रहा, आरोग्यसुविधा तयार ठेवा, असा इशारा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनसंस्थेने (एनआयडीएम) केंद्र सरकारला दिला आहे.
कोरोनाच्या लाटेवर लाटा येत आहेत. पहिली गेली. दुसरी ओसरली. आता पुढील महिन्यात तिसरी येईल, असा इशारा नीती आयोगाने रविवारीच केंद्र सरकारला दिला होता. दिवसाला पाच लाख रुग्ण सापडतील आणि त्यातील 23 टक्के रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांत भरती करावे लागेल. त्यासाठी 2 लाख आयसीयू बेड तयार ठेवा, असा सल्ला नीती आयोगाने दिला होता. त्याच्या दुसऱयाच दिवशी आज ‘एनआयडीएम’नेही पंतप्रधान कार्यालयाला असाच अहवाल सादर केला.
‘एनआयडीएम’ हे पेंद्रीय गृह खात्याच्या अखत्यारित येते. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला ‘थर्ड वेव्ह प्रिप्रेअर्डनेस – चिल्ड्रेन व्हल्नरेबिलिटी अॅण्ड रिकव्हरीज’ हा अहवाल सादर केला आहे. लहान मुलांसाठी तिसरी लाट अधिक धोकादायक आहे आणि त्यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजेत याची सविस्तर माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
देशात लसीकरण मोहिमेला वेग आला असला तरी आतापर्यंत वयोवृद्ध, प्रौढ आणि तरुण पिढीपर्यंतच लस दिली गेली आहे. त्यातही अनेकांचे लसीकरण बाकी आहे. लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. दुसऱया लाटेत शारीरिक व्याधी असलेल्या आणि किमान प्रतिकारशक्ती असलेल्या 60-70 टक्के मुलांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. देशातील प्राथमिक आरोग्य पेंद्रांमध्ये 82 टक्के बालरोगतज्ञांची कमतरता आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी सांगितले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.