बाल व निरिक्षण गृहातील मुलांच्या प्रश्‍नांना मिळणार उत्तर

राज्य परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना करणार हेल्पलार्इनद्वारे मार्गदर्शन

0
पुणे : वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर बाल आणि निरिक्षण गृहातून बाहेर पडणा-या मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर ही मुले भरकटण्याची शक्यता असते. तसेच बाहेर पडल्यानंतर आता पुढे काय? असा प्रश्‍न या मुलांना पडतो. त्यामुळे या मुलांना मुख्य प्रवाहात आणत त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिविक्षा आणि अनुरक्षण संघटनेने पुढाकार घेतला आहे.

बाल व निरिक्षण गृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या राहण्याची काय सोय होवू शकते. त्यांनी कोणते शिक्षण घ्यावे. त्यांना कोण शिक्षण पुरवू शकते. त्यांच्यासाठी सरकारच्या कोणत्या योजना आहे. तसेच या मुलांसाठी कोणत्या सामाजिक संघटना काम करतात, अशी मार्गदर्शक माहिती पुरविण्यासाठी व त्यांचे समुपदेशन करण्यासाठी संघटनेच्या वतीने हेल्पलार्इन सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या मुलांना बाल व निरिक्षण गृहातून बाहेर पडल्यानंतर पुढे काय करायचे या प्रश्‍नाचे उत्तर या हेल्पलार्इनवर मिळणार आहे. विधी संघर्षीत बालकांचे निरिक्षण गृहात रवानगी केली जाते. तर ज्याचे पालक मुलांचा सांभाळ करण्यास सक्षम नसतात अशा मुलांना बालगृहात ठेवले जाते.

 

यातील अनेक मुलांना एकच पालक असतात व ते सुशिक्षित असल्यात प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे ते मुलांना योग्य मार्गदर्शन करतीलच असेल नाही. त्यातून काही मुले गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता असता. या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटना कार्यरत आहे. या मुलांची माहिती सरकारी यंत्रणा आणि सामाजिक संस्थाकडून घेण्यात येत आहे, अशी माहीती संघटनेचे महेंद्र संभूस यांनी दिली.

१८ नंतरही राहण्याची व शिक्षणाची सुविधा :
या मुलांसाठी राज्यात सहा सरकारी व एक एनजीआचे वसतीगृह आहे. ज्यात ती मुल २१ वर्षांचे होईपर्यंत राहू शकतात. तेथे त्यांना शिक्षण देखील मिळते. मुलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी त्यांना तांत्रिक शिक्षण देण्यावर भर असतो.

ही मुले १८ वर्षांची झाल्यानंतर त्यांना सांभाळणारे कोणी नसेल तर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. समाजात चांगले स्थान आणि योग्य शिक्षण मिळाले तर ही मुले देखील प्रगती करू शकतील.
डी. एस. कुटे, कार्यकारी सचिव, राज्य परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना

हेल्पलार्इन नंबर – ८५३००९४८४८, ८५३००२४३४३

Leave A Reply

Your email address will not be published.