मुंबई ः सोमवारी रात्री उशीरापर्यंत चालू असणाऱ्या अंधेरीतील ड्रॅगन फ्लाय क्लबवर मुंबई पोलिसांनी छापा टाकला. त्यामध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनासहीत ३४ जणांना अटक केली होती. अशी चर्चा आहे की, या कारवाईमध्ये सेलिब्रिटींमध्ये प्रसिद्ध गायक गुरू रंधावा, रॅपर बादशहा आणि हृतीक रोशनची माजी पत्नी सुझान खानदेखील होते.
पहाटे ३ वाजता हा छापा पोलिसांनी टाकला होता. त्यावेळी गायक गुरू रंधावा, रॅपर बादशहा आणि हृतीक रोशनची माजी पत्नी सुझान मागील दरवाज्यातून पळून गेले. परंतु सुरेश रैनाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
यासंबंधी अधिक माहिती देताना सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, ”माहिती मिळाल्यावर डीसीपी राजीव जैन यांच्या पथकाने हा छापा टाकला. रात्री हाय-प्रोफाइल पार्टी सुरू होती. एकूण ३४ जणांविरूद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे. या पार्टीत दिल्ली आणि पंजाबमधील १९ जण होते तर दक्षिण मुंबईतील नऊजण होते. उर्वरित सातजण हे हॉटेलमधील कर्मचारी होते. सर्व ११ लोकांनी सकाळ ७ वाजताचं मुंबईहून दिल्लीला जाणारं विमान पकडलं”, अशा माहिती नांगरे पाटील यांनी दिली.