‘रेमडेसिवीर’ कंट्रोल रूमशी तासनतास संपर्क होऊ शकत नाही

0

पुणे : राज्यासह पुणे शहरात कोरोना संसर्गाच्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजक्शनचा मोठा तुडवडा आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात काही ठिकाणीच हे उपलब्ध होत आहे. यावर तोडगा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिवीर साठी कंट्रोल रूमची स्थापना केली आहे. मात्र कंट्रोल रूम स्थापन झाल्यापासून त्या टोल फ्री नंबर वर एकाच वेळी हजारो फोन ट्राय करत आहेत. मात्र तासन तास फोन लागत नसल्याची समस्या नागरिक व्यक्त करत आहेत.

पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी रेमडेसिवीर साठी कंट्रोल रूमची स्थापना केली आहे. ज्यांना इंजेक्शन हवे असतील त्यांनी 020-26123371 किंवा 1077 (टोल-फ्री) या क्रमांकांवर संपर्क साधावा; असे आवाहन करण्यात आले आहे.11 एप्रिल ते 31 मे 2021 पर्यंत ही कंट्रोल रूम कार्यान्वित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

मात्र कंट्रोल रूम स्थापन झाल्यापासून त्या टोल फ्री नंबर वर एकाच वेळी हजारो रेमडेसिवीर इंजक्शन मिळत नसलेल्या रुग्णांचे नातेवाईक फोन ट्राय करत आहेत. मात्र तासन तास फोन लागत नाही. फोन व्यस्त येत असल्याची समस्या नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.