पिंपरी चिंचवड शहरवासीयांना पावणेचार वर्षांपासून दिवसाआड पाणी

दररोज पाणीपुरवठा होण्यासाठी माजी नगरसेवक, नागरिकांची मागणी

0

पिंपरी : पिंपरीचिंचवडला गेल्या पावणेचार वर्षांपासून दोन दिवसांतून एकदा पाणी दिले जात आहे. धरण क्षेत्रात पाऊस चांगला झालाअसून पाणी साठा झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना दररोज पाणी द्या, अशी मागणी शहरवासीयांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, तांत्रिक कारण पुढे करून दिवसाआड पाणीपुरवठा धोरणाचे महापालिकेकडून समर्थन केले जात आहे.

पिंपरीचिंचवड शहर 181 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात वसले आहे. शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या आसपास आहे. शहरातीलअनेक भागांत टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. झपाट्याने दाट लोकवस्ती वाढल्याने पाण्याची मागणी सतत वाढत आहे. शहरातीलकाही भागांत अपुरा कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी जनसंवाद सभेत वारंवार केल्या जात आहेत. मात्र, पाणीपुरवठाविभागाकडून तक्रारी कमी झाल्याच्या दावा होत आहे.

दोन दिवसांतून एकदा पाणी मिळत असल्याने पुरेसा साठा झाल्याने शहरातील काही भागांतील नागरिकांची गैरसोय होते. तांत्रिकबिघाड किंवा जलवाहिनी फुटल्याने पाणी आल्याने सलग तीन दिवस पाणी मिळाल्याने त्या भागांतील रहिवाशांची प्रचंड गैरसोयहोते. ते धोरण बंद करून दररोज पाणी देण्याची मागणी वारंवार केली जात आहे. विशेषत: राजकीय पक्षांकडून तसेच, पदाधिकारी माजी नगरसेवकांकडून तशी मागणी होत आहे. शहराला पाणी देणारे पवना धरण पूर्णपणे भरल्यानंतर या मागणीस अधिक जोर चढतो. मात्र, पालिका प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे आतापर्यंचा अनुभव आहे.

आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी मिळाल्यानंतर दरररोज पाणी दिले जाईल, असे अधिकार्‍यांकडून सांगितले जात होते. ते पाणीशहराला उपलब्ध झाले आहे. सध्या 100 एमएलडीऐवजी केवळ 50 एमएलडी पाणी उचलले जात आहे. दिवसाआड पाणीपुरवठाअसेल तरच, संपूर्ण शहरात समन्यायिक पद्धतीने पाणीपुरवठा होऊ शकतो अन्यथा नाही, अशी ताठर भूमिका महापालिका प्रशासनाचीआहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या नशीबी दररोज पाणी नसल्याचे चिन्ह सध्या तरी दिसत आहे.

पावणेचार वर्षांपासून दोन दिवसांतून एकदा पाणी :

शहरात 25 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पावणेचार वर्षांपासून दोन दिवसांतून पाणी दिले जातआहे. तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हे धोरण सुरू केले. त्यानंतर राजेश पाटील सध्याचे शेखर सिंह हे दोन आयुक्त आले. मात्र, दोन दिवसांतून पाणी देण्याचे धोरण त्यांनीही कायम ठेवले आहे.

खासगी टँकर लॉबी पोसण्याचे महापालिकेचे उद्योग ? :

शहरातील अनेक हाऊसिंग सोसायट्यांना पाणी कमी पडत असल्याने ते खासगी टँकरद्वारे दररोज पाणी मागवितात. उन्हाळ्यात पाण्याचीमागणी वाढल्याने या टँकरची संख्या दुप्पटीने वाढते. निव्वळ खासगी टँकर लॉबी पोसण्यासाठी दररोज पाणी देता महापालिकेकडूनदिवसाआड पाणी दिले जात आहे, असे आरोप विरोधक सातत्याने करीत आहेत.

……

महापालिकेचा उपाययोजना :

निगडीप्राधिकरण सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता 500 एमएलडीवरून 600 एमएलडी करण्यात येत आहे. रावेत अशुद्ध पाणी उपसा केंद्राची पंपिंग क्षमताही वाढविण्याचे काम सुरू आहे. शहरात नव्याने 29 उंच टाक्या बांधण्यात येत आहेत. गळती रोखण्यासाठी नव्याने जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले आहे. आंद्रा भामा आसखेड पाणी प्रकल्पास गती देण्यासाठीस्वतंत्र समिती नेमली आहे. चिखली येथे 300 एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आला आहे. निघोजे येथे इंद्रायणीनदीवर अशुद्ध जलउपसा केंद्र बांधण्यात आले आहे. पवना बंद जलवाहिनी हा रखडलेला प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडेपाठपुरावा केला जात आहे. जुन्या महामार्गावर निगडी ते दापोडी अशी मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. अभय योजनेसप्रतिसाद मिळत नसल्याने शहरातील अनधिकृत नळजोड शोधून ते अधिकृत केले जाणार आहेत. पाणी बिल वसुलीची जबाबदारी करसंकलन विभागाकडे सोपविण्यात आली आहे.

…..

शहराला दिले जाणारे पाणी :

पवन धरण-520 एमएलडी

आंद्रा धरण-100 पैकी 50 एमएलडी

एमआयडीसी-30 एमएलडी

एकूण-600 एमएलडी

…..

शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 2019 पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा आहे. समन्यायिक पद्धतीने शहरातील उंच सखल अशा सर्व भागांत दोन दिवसांचे पाणी एकदाच दिले जात आहे. नागरिकांच्या तक्रारी खूपच अल्प प्रमाणात आहेत. यावरूनशहरात सुरळीतपणे योग्य दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नव्याने तयार झालेल्या हाऊसिंग सोसायट्यांना प्रति व्यक्ती पिण्यासाठी 40 लिटरऐवजी 90 लिटर पाणी दररोज दिले जात आहे. समन्यायिक पद्धतीने पाणी देण्यासाठी दिवसाआड पुरवठा करण्यात येत आहे. त्यात बदल केल्यास पाणीपुरवठा व्यवस्थापन बिघडू शकते.

श्रीकांत सवणे

सहशहर अभियंता

पाणीपुरवठा विभाग

महापालिकेचे अपयश :

पवना बंद जलवाहिनी प्रकल्प पूर्ण करणे

आंद्रा आणि भामा आसखेड धरणात 267 एमएलडी पाणी शहरात आणणे

महापालिकेच्या मैलासांडपाणी प्रकल्पांतील पाण्याचा पुर्नवापर करणे

सांडपाणी पुर्नवापर प्रकल्प कागदावरच

संपूर्ण शहरात प्रकिया केलेल्या पाण्याचे वितरण करणे

मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांत सांडपाण्याचा पुर्नवापर प्रकल्पाद्वारे त्या पाण्याचा वापर

नळजोडास स्मार्ट पाणीमीटर बसविणे

-100 गळती पाणी चोरी रोखणे

अनधिकृत नळजोड बंद करणे

Leave A Reply

Your email address will not be published.