महाविकास आघाडीतील पक्षांची धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर
काॅंग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी मित्रपक्षांना दिला इशारा
मुंबई ः महाविकास आघाडीतील शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. कारण, राहूल गांधींच्या नेतृत्वावर शरद पवारांनी केलेल्या टिप्पणीमुळे काॅंग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी ट्विट करून महाविकास आघाडीतील नेत्यांना इशारा दिला आहे.
महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हंटलं आहे की,”आघाडीतील काही नेत्यांच्या मुलाखती आणि लेख माझ्या निदर्शनास आले आहेत. काॅंग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मित्रपक्षांना सांगू इच्छिते की, हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर काॅंग्रेसच्या शिर्षनेतृत्वावर टीका-टिप्पणी करणं टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं. काॅंग्रेसचे नेतृत्व स्थिर आहे,, निर्णयक्षम आहे. राज्यातील आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे”, असे यशोमती ठाकूर यांनी मित्रपक्षांना इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार यांनी काॅंग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल भूमिका मांडली होती. त्यावरून काॅंग्रेस नाराज झालेली दिसत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील धुसफूस वाढलेली दिसत आहे.