सेल्समन आणि रिसेप्शनिस्टने केला साडेसहा लाखांचा अपहार

0

पिंपरी : वाहनांच्या शोरूम मध्ये सेल्समन आणि रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत असलेल्या दोघांनी नागरिकांना वाहनांची विक्री करूनत्यांच्याकडून आलेले पैसे स्वतःच्या बँक खात्यावर घेतले. तसेच नागरिकांना आरटीओ नंबर आणि कागदपत्र देता त्यांची फसवणूककेली. हा प्रकार 19 ऑगस्ट 2022 ते 16 जून 2023 या कालावधीत गारवे ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड वाकड शाखा येथेघडला.

गौरेश गजानन सुगते (25, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण मच्छिंद्र काळे(रा. काळेवाडी) आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गारवे ऑटोमोबाईल्स मध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम करतात. आरोपी प्रवीण हा तिथेसेल्समन म्हणून तर आरोपी महिला रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होते. आरोपींनी आपसात संगणमत करून शोरूम मधून बजाजकंपनीच्या विविध मॉडेलच्या दुचाकींची विक्री केली.

नमूद दुचाकींचे पेमेंट आरोपींनी वैयक्तिक फोन पे आणि बँक खात्यावर स्वीकारले. विक्री केलेल्या गाड्यांचे आरटीओ नंबर कागदपत्रे देता बनावट गेट पास, शोरूम बँक पावत्या बनवून ग्राहकांची फसवणूक केली. ग्राहकांकडून आरोपींनी एकूण सहा लाख 66 हजार33 रुपये स्वीकारून त्या रकमेचा अपहार करत शोरूमची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपासकरीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.