मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील सर्वच शाळा, काॅलेजला टाळं लागलं होतं. मात्र, गेल्या दोन महिन्यापांसून कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असल्याने राज्य सरकारने आठवीपासून ते काॅलेजपर्यंत वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, पहिली ते सातवी प्राथमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या याला देखील सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. तर, राज्यातील 1 ली ते 7 वीच्या शाळा सुरु करण्यासाठी आरोग्य विभागाची कोणतीही अडचण नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेटच्या बैठकीत यासंदर्भातील अंतिम निर्णय होईल.
येत्या 10 दिवसात याबाबत निर्णय होईल, अस देखील राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तसेच, आरोग्य विभागाची पहिली ते चौथी वर्ग सुरु करण्यास कोणती अडचण नसल्याचंही म्हटलं आहे.
1 ली ते 4 थी यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना ते बऱ्यापैकी जाऊन संसर्गित होणार नाहीत या पार्श्वभूमीवर त्यांना आपण शाळेमध्ये येऊन दिलं पाहिजे. 1 ली ते 4 थीचे वर्ग सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन सुरु करण्यास परवानगी द्यावी यासंदर्भात चाईल्ड टास्क फोर्सनं परवानगी द्यावी असं मत मांडलं आहे.
दरम्यान, राज्यात सध्या 700-800 रुग्ण आढळून येत आहेत. रुग्ण होण्याचा