कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्योजकांना मोठा फटका

0

पिंपरी : कोरोनामुळे देशासह, राज्याची आर्थिक स्थिती हलाखीची बनलेली आहे. यातच वाढत्या लॉकडाऊन मुळे उद्योग फक्त नावालाच सुरु आहेत. पहिल्या लॉकडाऊन मधून न सावरणारे उद्योजक दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत. सूक्ष्म, लघू उद्योगांना त्याचा मोठव फटका बसला आहे. उद्योगनगरीत भोसरी, तळेगाव आणि चाकण या औद्योगिक वसाहती आहेत.

अत्यावश्यक सेवा  आणि उत्पादने, निर्यात करणारे उद्योग सोडून इतर उत्पादन करणारे उद्योग बंद आहेत. तसेच उद्योगांना प्लेट्स, बार, ऑइल, यंत्राचे सुटे भाग पुरविणारी दुकानही बंद आहेत. सर्व ऑक्सिजन वैद्यकीय कारणासाठी वापरण्याचे बंधन असल्याने स्टील कटिंग करण्यात अडचण येत आहे. कोरोनाच्या भीतीने कष्टाची कामे करणारा परप्रांतीय मजूर गावी गेला आहे. त्याच बरोबर देशभर बंद असल्याने मागणी आणि पुरवठ्याचे गणितही विस्कळीत झाले आहे. टाळेबंदीचा प्रत्येक दिवस उद्योग आणि उद्योगांच्या अडचणीत वाढ करीत असल्याची प्रतिक्रिया उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

भोसरी, तळेगाव, चाकण  एमआयडीसीत दहा हजारांच्या आसपास कंपन्या आहेत. सर्व ठिकाणी ५० ते ६० टक्के क्षमतेने काम सुरु आहे. गेल्या आठवड्यापासून दिवस-रात्र तीन पाळीमध्ये (शिफ्ट) काम चालत होते. तिथे आता एका पाळीचे काम सुरू आहे. अनेकदा कामगारांना जास्तीचे काम करावे लागत होते. आता तितके काम राहिले नाही. काहींकडे उत्पादने तयार आहेत मात्र विक्री नाही. थोडीफार मागणी असणाऱ्यांना ऑक्सिजन आणि कच्चा माल उपलब्ध होत नाही.

गेल्या चौदा महिन्यांपासून उद्योग टाळेबंदी आणि इतर निर्बंधाचा सामना करत आहे. मागणी आणि पुरवठा याचे गणित विस्कळीत झाले आहे. मजूर आपापल्या गावी गेले, हाती असली थोडीफार मागणी पूर्ण करण्यासाठी कच्चा माल मिळत नाही. येणार प्रत्येक दिवस उद्योगांच्या अडचणीत प्रचंड वाढ करणारा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.