पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात नवरात्र उत्सवाच्या पवित्र सणानिमित्ताने तरुणाईला लैंगिक प्रशिक्षणदेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशन‘ने सेक्स तंत्र नावाने ऑनलाईन बुकिंग सुरु केल्यानेखळबळ उडाली आहे. या संदर्भात एक जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
जाहीरातीनुसार 1 ते 3 ऑक्टोबर रोजी असे तीन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात तरुण–तरुणींचासहभाग असणार आहे. सध्या हा मेसेज सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.
ध्यानधारणा आणि कामसूत्रातील लैंगिक क्रिया या संदर्भात या शिबिरात प्रशिक्षण दिले जाणार आहे. यंदाच्या नवरात्रीच्या निमित्ताने‘सेक्स तंत्र‘ या नावाने तीन दिवसांचा हा कोर्स आयोजित करण्यात आल्याची ही जाहिरात आहे. ही जाहिरात सोशल मीडियावर कुणीव्हायरल केली, याचा शोध पुणे सायबर पोलीस घेत आहेत. पुणे पोलिस सत्यम शिवम फाउंडेशनच्या सूत्रधारापर्यंत पोहोचणार का?, असा प्रश्न आता पुणेकर करत आहेत.