संत तुकाराम महाराजांचे शिळा मंदिर हे भक्ती आणि शक्तीचे केंद्र नसून संपूर्ण भारताचे आधार केंद्र आहे : मोदी

0

देहू : ज्या शिळेवर संत तुकाराम महाराजांनी तेरा दिवस तपश्चर्या केली, त्याचे उद्घाटन करण्याचे मला भाग्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. ही केवळ शिळा नाही तर भक्ती आणि ज्ञानाचा आधार शिळा आहे. हे मंदिर केवळ भक्ती आणि शक्तीचे केंद्र नाही, तर संपूर्ण भारताचे भविष्य भव्य करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकऱ्यांना संबोधित करताना मराठीतून सुरुवात केली. तसेच, त्यांनी समस्त वारकऱ्यांच्या चरणी नमस्कार म्हणून आपल्या भाषणाला प्रारंभ केल्याने त्यांनी सर्व वारकऱ्यांची मने जिंकली. भगवान विठ्ठल आणि वारकऱ्यांच्या चरणी माझा कोटी-कोटी नमस्कार. काही महिन्यांपूर्वी पालखी मार्गावरील दोन राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदीकरणाचे भूमिपूजन करण्याची संधी मिळाली.


ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम पाच टप्प्यात आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यात पूर्ण होईल. या प्रकल्पातील एकूण मार्गाची लांबी 350 किलोमीटरपेक्षा जास्त लांब महामार्ग तयार केला जाईल. त्यासाठी 11 हजार कोटी रुपयांचा खर्च होईल. असे मोदी म्हणाले. त्यानिमित्ताने या जागेचा विकास होईल. पंढरपुरातील पालखी मार्गाप्रमाणे चारधाम मार्ग, सोमनाथ मंदिर आणि अयोध्येतील राममंदिराचे कामही वेगाने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

आपण आपल्या प्राचीन परंपरा जिवंत ठेवल्या पाहिजेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात विकास आणि वारसा एकत्रपणे पुढे नेले पाहिजे. तुकोबारायांची शिळा भक्ती आणि आधाराचे केंद्र होईल. संत तुकोबाराय हे संत संप्रदायाच्या मंदिराचा कळस, संत तुकाराम महाराजांचे अभंग अनेक पिढ्यांचे मार्गदर्शक संतांच्या कार्यातून नित्य उर्जा मिळत राहते.

आपल्याला गर्व आहे, आपण जगातील प्राचीन जीवित सभ्यतामध्ये एक आहोत. त्याचे श्रेय भारताच्या संत-साधू परंपरेला जाते. भारत शाश्वत आहे. कारण भारत संतांची धरती आहे. प्रत्येक युगात आपल्याकडे देश आणि समाजाला दिशा देयला, कोणी ना कोणी व्यक्ती अवतार घेते.

Leave A Reply

Your email address will not be published.