जादूटोणा करणारा मांत्रिक रांजणगाव पोलिसांच्या ताब्यात

0
पुणे : ऊस तोडणीच्या कामादरम्यान विषारी साप चावल्यानंतर त्या व्यक्तीवर अघोरी उपचार करणार्‍या एका मांत्रिकाला रांजणगाव पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तीला वेळीच उपचार मिळाल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील गणेगाव खालसा या ठिकाणी ऊस तोडणी करत असताना एका व्यक्तीला अ विषारी साप चावला होता. व्यक्तीवर दवाखान्यात उपचार न करता एक मांत्रिक अघोरी उपचार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी समवेत घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना ऊसतोड मजूर अंकुश बंडू वाघ त्यांच्यावर अघोरी उपचार सुरू असल्याचे दिसले.
पोलिसांनी या ठिकाणाहून कथित मांत्रिक जयवंत श्रीपती शिंदे याला ताब्यात घेतले. ऊसतोड मजुर अंकुश वाघ याची या ठिकाणाहून सुटका करत त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. वेळेत औषधोपचार मिळाल्यामुळे अंकुश वाघ यांचे प्राण वाचले आहेत.
त्यानंतर गणेगाव खालसा चे पोलीस पाटील विनायक दंडवते यांनी दिलेल्या तक्रारीवरून कथित मांत्रिक जयवंत शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून रांजणगाव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.