‘स्पा आणि वेश्या व्यवसाय’ शहराला लागलेली कीड

0

पिंपरी : ग्रामीण आणि काही शहरी भाग असा संमिश्र असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील अवैद्य धंदे सुरुच आहेत. जगावर, राज्यावर, आपल्या शहरावर कोरोना सारख्या महामारीचे संकट असताना देखील जोमाने सुरु असलेल्या अवैद्य धंद्यावर पोलिसांनी कारवाई केली. मात्र यामुळे पुन्हा एकदा शहरातील ‘स्पा’ व्यवसायाच्या नावाखाली खुलेआम सुरु असणाऱ्या वेश्या व्यवसायाची पुष्टी झालेली आहे.

संतांची भूमी असणारे देहू-आळंदी, ग्रामीण संस्कृती असणारे मावळ आणि शहराच्या बाजूची गावे, शिक्षणाचे माहेर घर असणाऱ्या पुण्यातील काही संस्थान ही ओळख होती पिंपरी चिंचवड शहराची. औद्योगिकनगरी म्हणून शहराची संपूर्ण जगात ओळख झाली त्यानंतर शहराला लागूनच असणाऱ्या हिंजवडी ग्रामीण पट्ट्यात आयटी हब आले अन नंदनवंदन सुरु झाले.

आयटी हबमुळे शहराचा कायापालट झाला. भुमीपुत्रांच्या जमिनींना सोन्याचे भाव आले. झपाट्याने विकास वाढत असताना विकृतीही त्याच पट्टीने वाढू लागल्या. शहरात अवैद्य धंदे वाढू लागले. याचा त्रास सर्वसामान्यांना बसू लागला. याच आयटी पार्कच्या परिसरात मसाज सेंटर (स्पा) सुरु झाले. पाहता पाहता याचे लोण संपूर्ण शहरात पसरले. आज शहराच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात स्पा पाहायला मिळतात.

कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला आणि अवैद्य धंद्यावर कारवाईचा धडाका सुरु झाला. कृष्ण प्रकाश यांनी अवैद्य धंदेवाल्यांचे कारवाई करुन अक्षरशः कंबरडे मोडून काढले. यातच कोरोनाच्या महामारीचे संकट आले. दुसऱ्या लाटेत राज्य शासनाने संपूर्ण लॉकडाऊन केले. शासनाने हळू हळू अनलॉक सुरु केले आहे.

याच अनलॉकचा गैरफायदा घेत पिंपरी चिंचवड शहरातील स्पा पुन्हा त्याच जोमाने सुरु झाले. याची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांनी पुन्हा कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे दोनच दिवसात शहतील सहा स्पा सेंटर वर छापे टाकून कारवाई केली. वेश्या व्यवसायास बळी पडलेल्या तरुणींची सुटका केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात शेकडो स्पा आहेत. यातील काहीच स्पा फक्त नियमांचे पालन करुन चालविले जात आहेत. इतर ठिकाणी सर्रास गैरप्रकार सुरु आहेत. गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस माहिती मिळाल्यानंतर त्यावर कारवाई करतात. मात्र काही दिवसातच पुन्हा हे स्पा त्याच पद्धतीने सुरु होतात. त्यामुळे स्पा आणि वेश्या व्यवसाय ही शहराला लागलेली कीड आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.