कथा ‘कश्मीरा’च्या प्रेमाची 

0

मुंबई ः आपल्या बोल्ड सीनमुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री काश्मीरा शहा सोशल मीडियावर फोटो अपलोड करत असले. चाहते तिच्या फोटोंवर काॅमेंट्स आणि लाईक्स पाऊस पाडतात. काश्मीराने बाॅलिवुडमध्ये आणि छोट्या पडद्यावरही खूप नावाजली गेलेली अभिनेत्री आहे. काश्मीरा आज आपला ४९ वा वाढदिवस साजरा करते आहे. तिचे लव्हलाईफही मजेदार आहे. तिच्या आयुष्यातील काही इंटरेस्टिंग बाबी…

तर, काश्मीराने पहिल्यांदा हाॅलिवूडचा निर्माता ब्रेड लिसरमनसोबत विवाह केला होता. खरं तर तिचं हे वैवाहिक जीवन फारसं चाललं नाही. फक्त सहा वर्षांतच दोघांनी वेगळे राहण्याचा विचार केला. लग्नानंतर सहा वर्षांतच तिने घटस्फोट घेतला आणि पुन्हा एकदा बाॅलिवुडमध्ये आपलं नशीब आजमविण्यासाठी प्रयत्न करू लागली. तिला खूप चित्रपटंही मिळाली.

अभिनेता कृष्णासोबत पहिल्यांदा काश्मीरा जयपूरमध्ये ‘और पप्पू पास हो गया’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान भेटली. पहिल्यापासून कृष्णाच्या मनात काश्मीराबद्दल साॅफ्टकाॅर्नर होता. मात्र, काश्मीराचे लग्न झाल्यामुळे कृष्णा नाराज होता. परंतु, जेव्हा कृष्णाला कळले की, काश्मीराचा घटस्फोट झाला आहे तेव्हा त्याने कश्मीराशी जवळीक साधण्याचा जास्त प्रयत्न करू लागला. काश्मीर घटस्फोटामुळे तणावात होती, तेव्हा कृष्णाने चांगलीच साथ दिली.

जवळीच इतकी वाढली की, त्यांना त्यांच्या वयाच्या अंतरावरून जग काय म्हणते आहे, याचा फरक पडला नाही. काश्मीरा कृष्णापेक्षा १० वर्षांने मोठी आहे. त्यांनी २०१२ मध्ये लग्न केले आणि आता बाॅलिवूडमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक जोडी आहे.

काश्मीराच्या बाॅलिवूड प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर, १९९७ मध्ये शाहरुख खानच्या ‘येस बाॅस’ चित्रपटातून सुरुवात केली. त्यानंतर एका मागून एक अशा अनेक चित्रपटांतून ती काम करत राहिली. प्यार तो होना ही था, हिंदुस्तान की कसम, दुल्हन हम ले जाएंगे, कही प्यार ना हो जाए, आशिक, मर्डर, वेक अप सिड, अशा अनेक चित्रपटांतून तिने वाखण्याजोगे काम केले. काश्मीरा बीग बाॅस सिजन एकचा भाग राहिलेली आहे. त्यावेळी ती ५१ व्या दिवशी त्यातून बाहेर पडलेली होती. २००७ मध्ये ती कृष्णा अभिषेकसोबत नच बलिए मध्ये दिसून आली.

Leave A Reply

Your email address will not be published.