महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

0

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सुप्रीम कोर्टानं मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्राबाहेर स्वतंत्र यंत्रणांनी त्यांच्या विरोधातील प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा मानला जात आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाने परमबीर सिह यांना चांगलेच फटकारले.

सुप्रीम कोर्टाने म्हटले की, तुम्ही 30 वर्षे पोलीस दलात काम करत आहात. तुम्ही आता महाराष्ट्राबाहेर चौकशी करण्याची मागणी करत आहेत. तुम्ही महाराष्ट्र केडरचा भाग आहात. तुम्हाला आता तुमच्या राज्यावर विश्वास साहिला नाही का ? तुमची मागणी धक्कादायक असल्याचे सुप्रीम कोर्टानं परमबीर सिंह यांना सुनावलं आहे.

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती वी. रामसुब्रमण्यम यांच्यासमोर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टाकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. परमबीर सिंह यांच्या बाजूने वरिष्ठ वकिल महेश जेठमलानी यांनी परमबीर सिंह यांच्यावतीने युक्तीवाद केला.

तुम्हाला फौजदारी कायद्याचे ज्ञान आहे. तुमच्या विरोधात दाखल झालेल्या एफआयआरवर (FIR) तुम्ही स्थगिती द्यावी का ? आम्ही सर्व एफआयआरबद्दल बोलत नाही. एफआयआरसाठी न्यायदंडाधिकारी आहेत त्यांच्याकडे जावा, असं कोर्टानं सांगितलं. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दगड मारु नये, असेही म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.