पिंपरी : सध्याची अवस्था राज्याचे प्रश्न कोमात आणि स्वबळाची छमछम जोरात, अशी आहे. पोलिसांकडून राज्यात वसुलीचं काम सुरू आहे. महाविकास आघाडीमधील नेते सकाळी उठले की स्वबळ असे करतात, कोण दिल्लीला जातं, तर कोण बैठक घेत आहेत. महाविकास आघाडीमधील नेते सकाळी उठले की 108 वेळा स्वबळाचा मंत्र जपत आहेत, असा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकार वर टोला लगावला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत शिवसेनेचा महापौर होईल असा विश्वास व्यक्त करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला. बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला तरी गाय, बैल होत नाही, असंही आशिष शेलार म्हणाले.
भूखंडाचे श्रीखंड पार्ट 2 हा धंदा महाविकास आघाडीने सुरू केला आहे. जनतेतून निवडून आलेल्या सदस्याचे अधिकार काढून घ्यायचे, असं म्हणत त्यांनी 12 आमदारांच्या निलंबनवार भाष्य केलं.
फोन टॅपिंगचा कारभार हा केंद्र सरकारचा नाही. असेल तर पुरावा द्यावा, नाही तर गप्प बसावं, अशी ताकीद आशिष शेलार यांनी विरोधकांना दिली.