नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व शिंदे गटाने निवडणूक चिन्ह म्हणून मागणी केलेले त्रिशूळ व गदा ही दोन्ही चिन्हे बाद ठरवली आहेत. यासाठी आयोगाने ही चिन्हे धार्मिक प्रतीके असल्याचा दाखला दिला आहे. तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळाले आहे.
निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ गोठवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यात त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या संभाव्य निवडणूक चिन्हांची व पक्षाच्या नावाचीही माहिती दिली होती.
ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे तीन चिन्हे दिली होती. यात एक त्रिशुळ, दुसरा उगवता सूर्य आणि तिसरा आहे धगधगती मशाल नावेही निवडणुूक आयोगाला दिली होती. परंतु त्यातील त्रिशूळ हे चिन्ह आयोगाने रद्दबातल ठरवले. तर शिंदे गटाचेही गदा हे चिन्ह रद्दबातल ठरवले आहे. दोन्ही चिन्हे धार्मिक असल्याचेही निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.
ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हे तीन चिन्ह पर्याय म्हणून दिले होते. त्यानंतर आयोगाने त्यांना धगधगती मशाल हे नाव दिले आहे.
शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे ही तीन नावे उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला दिली आहेत. त्यामुळे या नावाचे आता काय होणार यावर नेमका काय निर्णय येणार हे आज किंवा उद्या सकाळी कळू शकेल.