लाखो रुपयांचे बांधकाम साहित्य चोरणारा अटकेत

0

पुणे : बांधकाम साईटवरून रोज थोडे-थोडे करत तब्बल चार लाखांचे बांधकाम साहित्य चोरणाऱ्याला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा चोरीचा प्रकार मागील दिड महिन्यापासून सुरु होता. महेश सिताराम दमाई (24, रा. मुळशी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शरद दगडू राठोड (33, रा.हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मागील एक ते दिड महिन्यापासून पारखे वस्ती येथील महाराजा फर्निचरच्या मागे असलेले बांधकामचे स्टील व इतर सामान चोरी होत होते. यावरून फिर्यादी यांनी पोलीस तक्रार दिली. पोलीस व फिर्यादी यांनी पाळत ठेऊन आरोपीला शनिवारी (दि.13) मध्यरात्री रंगेहाथ पकडले.

यावेळी त्याने तब्बल 2 लाख रुपयांचे साहित्य व 2 लाख 18 हजार रुपयांचे बांधकामाचे स्टील व लोखंडी गट्टू असा एकूण 4 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे उघड झाले. हिंजवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डॉ.विवेक मुगळीकर, सोन्याबापू देशमुख, सुनील दहिफळे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.