आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ येणे दुर्देवी : संजय राऊत

0

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत काढण्यात आलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चावर बोचरी टीका केली आहे. ते म्हणाले – ‘देशात नरेंद्र मोदी व अमित शहा या 2 ताकदवान हिंदू नेत्यांचे राज्य आहे. महाराष्ट्रातही आता हिंदूंचे राज्य आल्याचा दावा केला जाl ताहे. त्यानंतरही जनआक्रोश मोर्चा काढण्याची वेळ येणे ही दुर्दैवी गोष्ट आहे. यावरून स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या नेत्यांकडून हिंदूनाच न्याय मिळत नसल्याचे स्पष्ट होते.’

मुंबईत रविवारी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजप व शिंदे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांसह जारो नागरिक सहभागी झालेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या मोर्चावर निशाणा साधला आहे.

देशात नरेंद्र मोदी व अमित शहा या ताकदवान हिंदू नेत्यांचे राज्य आहे. महाराष्ट्रातही हिंदूंचे राज्य आल्याचा दावा केला जात आहे. त्यानतंरही राज्यात आक्रोश मोर्चा निघत आहे. सद्यस्थितीत स्वतःला हिंदू समजणाऱ्या नेत्यांकडूनच हिंदूंना न्याय मिळत नाही. त्यामुळे हा आक्रोश मोर्चा योग्यच आहे,’ असे संजय राऊत म्हणाले.

‘देशात शक्तीमान हिंदू नेत्यांचे राज्य असूनही काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित न्यायासाठी आक्रोश करत आहेत. हिंदूंवर गोळ्या चालवणाऱ्या मुलायमसिंह यादव यांचा केंद्राने पद्मविभूषण देऊन गौरव केला. याचा निषेध करण्यासाठीही हा आक्रोश मोर्चा सुरू आहे. त्यामुळे या आक्रोश मोर्चाचे स्वागतच करायला पाहिजे,’ असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

‘या देशात स्वतःला हिंदुत्ववादी समजणाऱ्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही. त्यामुळे असे मोर्चे काढावे लागत आहेत. हे हिंदूंचे मोठे दुर्दैव आहे. मागील 8 वर्षांपासून हिंदू समाजाचा आक्रोश सुरू आहे. त्यांना कुठे न्याय मिळाला? सद्यस्थितीत हिंदू समाजाची मुस्कटदाबी सुरू आहे. या विरोधात हा मोर्चा निघत असेल, तर चांगलीच गोष्ट आहे,’ असेही संजय राऊत यांनी यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.