येणारा काळ धोक्याचा, काळजी घेणे हाच उपाय

0

नवी दिल्ली : जगभर पसरलेल्या कोरोना महामारीची महासाथ भविष्यात लवकर संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. कोरोना विषाणू दीर्घकाळ भूतलावर वास्तव्य करणार आहे. त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी लसीकरणाबरोबरच आरोग्याची काळजी घेणे हेच तूर्तास आपल्या हाती असल्याचे प्रतिपादन WHO चे अध्यक्ष टेड्रोस घेब्रेस्युस यांनी केले आहे. तसेच जगात लसीकरण मोहिमेने वेग घेतला असला तरी केवळ लस हाच यावरील एकमेव उपाय आहे, असे नाही, असे ते म्हणाले.

घेब्रेस्युस यांनी एका पत्रकार परिषदेत कोरोनाच्या विदारक परिस्थितीवर कथन केले आहे. जगात आतापर्यंत 78 कोटी लसी दिल्या गेल्या आहेत. तरीही अद्याप ही साथ आटोक्यात आली नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत सलग सहा आठवडे कोरोना फैलाव कमी झाला होता. मात्र आता सलग सात आठवडे कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अनेक आशियाई तसेच मध्य पूर्वेकडील देशांमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. कोरोनातून बरे झालेल्यांवर या विषाणूचे दीर्घकालीन परिणाम संभवतात. काही लोकांमध्ये या आजाराविषयी बेफिकिर वृत्ती दिसते. हा आजार हा आपल्याला होणारच नाही, असा तरुणांचा भ्रम आहे. त्यामुळे हा भ्रम दूर करण्याबरोबरच काळजी घेणे हेच फायद्याचे ठरणार असल्याचे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.