पिंपरी : आदर्श समाज घडला तर आदर्श राष्ट्राची देखील निर्मिती होते. त्यासाठी जबाबदारीची जाणीव असलेली पिढी घडविणे गरजेचे आहे. अशी पिढी घडविण्याची जबाबदारी प्रत्येक जबाबदार नागरिकांवर असते. त्यामध्ये मात्र सर्वात महत्वाचे योगदान शिक्षकांचे असते. शिक्षक हे ज्ञानसंपन्न पिढी व युवक घडवीत असतात. त्यांच्याच आधारावर आदर्श समाज व राष्ट्राची निर्मिती होते.
शिक्षक दिनानिमित्त गणेश कस्पटे यांनी कस्पटेवस्ती शाळेत जाऊनसर्व शिक्षकांचा सत्कार केला. यावेळी माोहन कस्पटे, रामदास कस्पटे, सचिन कस्पटे, सुधिर कस्पटे, सोमनाथ कस्पटे, अनिल कस्पटे उपस्थित होते.
विद्यार्थी व युवक हा देशाच्या जडणघडणीत महत्वाचा दुवा आहे. त्यांना योग्य दिशा दाखविण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करून पुढील कार्यास बळ देणे गरजेचे आहे. या उद्देशाने घरोघरी जाऊन शिक्षकांचा सत्कार करण्याचा उपक्रम घेतला असल्याचे गणेश कस्पटे यांनी सांगितले.
देशासह राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झाला होता. त्या काळात शाळा, महाविद्यालय देखील बंद होते. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणुन ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय पुढे आला.
त्याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन शिक्षणाची ज्ञानगंगा पुढेही सुरूच ठेवण्याचे काम शिक्षकांनी केले. कोरोना सारख्या वातावरणातही विद्यार्थ्यांचे नुकसान झाले नाही. शिक्षकांचे हे कष्ट पाहता त्यांचा योग्य सन्मान झाला पाहिजे असे गणेश कस्पटे यांनी म्हटले आहे.